1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

आईसलँड भूकंपाने हादरले

आईसलँडच्या दक्षिण भागाला काल जबरदस्त भूकंपाचा धक्का बसला. अमेरिकी भूगर्भ शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी नोंदविली गेली.

या भूकंपात जीवित अथवा वित्तहानी किती झाली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, अनेक भागात घरांना नुकसान झाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने त्वरित भूकंपाचे केंद्र असलेल्या भागात बचावदल पाठवले असून, नुकसान नेमके किती झाले याचा अंदाज घेतला जात आहे.