कॅनबरा बनली युद्धभूमी
ऑलिंपिक ज्योतीला कॅनबरात होणार विरोध पाहता सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आल्यावरही चिनी समर्थक आणि तिबेटी निदर्शनकर्त्यांमध्ये काल जोरदार संघर्ष झाला. यात काही ऑस्ट्रेलियन नागरिकांनाही चोप मिळाल्याने पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.
सध्या कॅनबराला युद्धभूमीचे स्वरूप आले आहे. तिबेटी नागरिक ज्योतला विरोध करण्यासाठी आधीच येथे दाखल झाले आहेत, तर तिबेटींना रोखण्यासाठी चीन समर्थकांचे लोंढेही सध्या कॅनबराच्या दिशेने येत आहेत.
या दोनही समर्थकांना रोखाने पोलिसांना जड जात आहे. सॅनफ्रान्सिस्को, लंडनसह अनेक ठिकाणी ज्योत विझवण्याचा प्रयत्न झाल्याने कॅनबरातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.