1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

चीनला बुश यांची विनंती

तिबेट प्रश्नी काही दिवसांपूर्वी अमेरिकेने चीनला इशारा दिला होता. आता पुन्हा एकदा अमेरिकेने चीनला विनंती केली असून, तिबेटी नागरिकांच्या भावनांचा आदर करत चीन सरकारने लामा किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी शांततेच्या मार्गाने चर्चा करावी अशी विनंती केली आहे.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी चीनला ही विनंती केली असून, चीन सरकारने तिबेट मधील दमनसत्र थांबवावे आणि लामांशी चर्चा करून यातून मार्ग काढावा अशी विनंती त्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तिबेट प्रश्न चिघळतच चालला आहे. नुकतेच चीनने तिबेटींवर गोळीबाराच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यानंतर चीनवर तिबेटी प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी दबाव वाढतच चालला आहे.