जी-8 संमेलनावर भूकंपाचे सावट
इटलीच्या भूकंपग्रस्त शहर लाअक्वीलामध्ये आठ ते 10 जुलै दरम्यान होणा-या जी-8 आणि जी-5 शिखर संमेलनात दरम्यान भूकंप येण्याची शक्यता असून यासाठी संमेलनात सहभागी झालेल्या राष्ट्रप्रमुखांना आपात्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याच्या योजनेसंदर्भात आज माहिती देण्यात आली असून कुठल्याही स्थितीत येथून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या रोमपर्यंत उड्डाणासाठी 12 हेलिकॉप्टर्स तयार ठेवण्यात आले आहेत.जी-8 संमेलनात सहभागासाठी आलेल्या नेत्यांच्या अजेंड्यावर भूकंप नसला तरीही आर्थिक मंदी, जलवायु परिवर्तन, खाद्य आणि ऊर्जा सुरक्षा सारख्या अन्य जागतिक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी जमलेल्या नेत्यांच्या डोक्यात भूकंप हा विषय असणार आहे हे मात्र निश्चित. या संमेलनात जगभरातील अर्थव्यवस्थेच्या 90 टक्के भागाचे प्रतिनिधीत्व करणा-या नेत्यांचा समावेश आहे.