1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

फजलुल्लाह गंभीर जखमी

तालिबानी कमांडर फजलुल्लाह पाक सैन्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. पाकचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्वात भागात पाक सैन्याने निर्णायक युद्ध सुरू केले असून, यात अनेक तालिबानी नेते मारले गेले आहेत. सध्या पाक सैन्याला तालिबानी कमांडर बैतुल्ला हवा असल्याने पाक सैन्याने स्वात भागात जोरदार हल्ले सुरू केले आहेत. या हाल्ल्यात पाकने फजलुल्लाहला जखमी केले आहे.

त्याचा ठावठिकाणा पाक सैन्याला मिळाला नसला तरी तो गंभीर जखमी झाला असल्याचे पाक सैन्याचे म्हणणे आहे.