1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

बकिंगहॅम पॅलेसची दुरवस्था

बकिंगहॅम पॅलेसची दुरवस्था
ब्रिटनच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला महाराणी एलिझाबेथचा बकिंगहॅम पॅलेसची दुरवस्था झाली आहे. त्याची दुरूस्ती करण्यासाठी महाराणीला ब्रिटनच्या मंत्रिमंडळाला साकडे घालावे लागले आहे. पॅलेसच्या दुरूस्तीसाठी लवकरच पावले उचलावीत असे मंत्रिमंडळाला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पॅलेसचे अनेक ठिकाणचे चिरे पडले आहेत, ही सर्वांत चिंताजनक बाब आहे. पॅलेसच्या पूर्व भागाची परिस्थिती खूपच खराब आहे. विम्बल्डनच्या मुख्य कोर्टची तसेच व्हिक्टोरीया व अल्बर्ट संग्रहालयाची अवस्थाही खराब आहे.

या पॅलेसच्या देखभालीसाठी ब्रिटनच्या कला व संस्कृती मंत्रालयातर्फे दरवर्षी पंधऱा दशलक्ष पौंड मिळतात. त्यातून दुरूस्तीची कामे केली जातात.
About Writer
एएनआय