1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

वेनेझुएलात विमानाला अपघात..?

काल (दि 21) रोजी अचानक गायब झालेल्या विमानाशी अद्यापही कोणताच संपर्क होऊ न शकल्याने, या विमानाला अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आदियान शहरातून राजधानी कराकास कडे जाण्यासाठी उडालेल्या या प्रवासी विमानात चालकदलातील कर्मचार्‍यांसह 46 प्रवासी आहेत. स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहिती नुसार कराकास पासून दक्षिणेस 680 कि.मी दूर मेरिडा इथे विमानाला अपघात झाला असून विमानात स्फोट झाल्याने ते जमिनीवर कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळू शकला नाही.