1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|

सात आश्चर्यांची घोषणा शनिवारी

सात आश्चर्यांची घोषणा शनिवारी
ताजमहालाचा जगातील सात आश्चर्यात समावेश होईल किवा नाही याबाबतची ताणली गेलेली उत्सुकता शमण्यासाठी शनिवारपर्यंत वाट पहावी लागणार आहे. शनिवारपर्यत सात कोटी नागरिक यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून मत नोंदवतील, असा आयोजकांचा अंदाज आहे.

सात आश्चर्यासाठी निवडलेल्या एकवीस जागतिक वारशांमध्ये ताजमहालाचा पहिल्या दहांमध्ये समावेश आहे. सातमध्ये समावेश होण्यासाठी ताजमहालाच्या शर्यतीत ग्रीसचा एक्रोपॉलिस, मेक्सिकोचा चिचेन इत्जा, रोममधील कोलिसियम व फ्रान्सचा आयफेल टावर आहेत. चीनची भिंत, जॉर्डन येथील पेट्ररा इस्ट द्विप प्रतिमा याशिवाय ब्रिटनच्या स्टॉनहँजचा समावेश आहे.

ही क्रमवारी जाहीर करण्याची योजना खासगी संस्थेतर्फे करण्यात येत आहे. स्वित्झर्लंडमधील संग्रहालयाचे क्यूरेटर बनार्ड वेबर यांच्या डोक्यातून ही सुपीक कल्पना निघाली. अफगाणिस्तानातील बामियान येथील बुद्ध मूर्ती तोडल्यानंतर त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली.