खराब फलंदाजीमुळे पराभव- गांगुली
इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) राजस्थान रॉयल्स संघाकडून काल सहा गड्यांनी मात मिळाल्यावर कोलकाता नाइट रायडर्सच्या पराभवाला खेळाडूंची खराब फलंदाजी कारणीभूत असल्याचे कर्णधार सौरव गांगुली याने सांगितले आहे.
उपांत्य पूर्व फेरीच्या शर्यतीतून जवळ जवळ बाद झालेल्या कोलकाता नाइट रायडर्सने संपूर्ण स्पर्धेत निराशाजनक फलंदाजी केल्याचे गांगुलीने सांगितले.
राजस्थान संघाला मोठे आव्हान देण्यासाठी आमच्याकडे आणखी 20 धावा कमी पडल्याचे सांगत सामना प्रथम क्रमांकाच्या संघाबरोबर होता. रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर जखमी असल्यामुळे त्याच्या जागी संधी देण्यात आलेल्या उमर गुलने चांगली गोलंदाजी केल्याचे त्याने सांगितले.
राजस्थान रॉयल्सचा खेळाडू युसूफ पठाणचे त्याने कौतुक केले. पठाणने नाबाद 18 चेंडूत 48 धावा काढल्या होत्या. उरलेल्या दोन सामन्यात आम्ही चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु, उपांत्य पूर्व फेरीत पोहचणे आता खूपच कठीण झाले असल्याचेही त्याने सांगितले.