1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या

गोलंदाजांमुळे विजय- युवराज

गोलंदाजांमुळे विजय- युवराज
इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (आयपीएल) कुमार संघकाराने केलेल्या 94 धावांचा शानदार खेळ आणि गोलंदाजांमुळे आपल्याला पहिला विजय मिळाला असून त्याचे श्रेय गोलंदाजांना असल्याचे किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार युवराजसिंगने सांगितले.


सामन्यादरम्यान आमच्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले आणि फलंदाजांनी चांगली सुरवात केल्यामुळे हा विजय मिळाल्याचे युवराजने सामन्यानंतर सांगितले.

श्रीलंकेच्या कुमार संगकाराने केलेल्या अर्धशतकाचे त्याने कौतुक करत ब्रेट ली आणि इरफान पठाणनेही उत्तम गोलंदाजी करून बळी मिळविल्याचे त्याने सांगितले.
About Writer
भाषा