1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या

लवकरच फिट होईल- सचिन

लवकरच फिट होईल- सचिन
बंगळूर रॉयल चॅलेंजर्सविरूद्ध मुंबई इं‍डियन्स या संघाच्या पहिल्या आयपीएल सामन्यात खेळण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपण लवकरच फिट होणार असल्याचे स्पष्ट केले. वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या सामन्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असून मी लवकरच फिट होईल अशी अपेक्षा सचिनने व्यक्त केली आहे.

मी फिजीओथेरपिस्ट यांच्या सल्ल्यानुसार विश्रांती आणि व्यायाम करत आहे. समान्यासाठी अजून वेळ असल्यामुळे मी आत्ताच सामन्यात खेळण्याबाबत काहीही निर्णय घेवू शकत नाही. काल मुंबई इंडियन्स संघ लॉंच करण्‍यात आला तेव्हा तो बोलत होता.

दक्षिण आफ्रिका दौर्‍यात दुखापतीमुळे शेवटच्या दोन कसोटी सामन्यात खेळू न शकलेल्या सचिनने अजून काहीही निर्णय घेतला नाही. संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी फिरकी गोलंदाज हरभजनसिंगला उपकर्णधार करण्याची घोषणा केली आहे. संघ लॉंच करण्याच्यावेळी माजी खेळाडू सुनिल गावस्कर आणि नीता अंबानी हे उपस्थित होते.

ट्वेंटी-20 सामने जास्त रोमांचक असतील तसेच विरोधी संघासाठी विविध डावपेच रचले असल्याचे तेंडुलकरने सांगिलते. लसिथ मलिंगा आणि लूट्स बोसमॅनला सोडून संघातील 27 खेळाडूंना दादरच्या शिवाजी पार्कच्या मातीचा टिळा लावला. तेंडूलकरचे लहानपण याच पार्कच्या मातीत क्रिकेट खेळताना गेले आहे.
About Writer
भाषा