हरभजनवर कायमची बंदी?
ऑफ स्पिनर हरभजन व श्रीसंत यांच्यातील 'श्रीमुख' नाट्याचा तिसरा आणि (कदाचित) अखेरचा अंक मंगळवारी सादर होणआर आहे. यासंदर्भात चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या सुधीर नानावटी समितीचा अहवाल मंगळवारी सादर होईल.
यापूर्वी श्री. नानावटी सोमवारी अहवाल सादर करणार होते. आपल्या अहवालात आपण कोणत्याही खेळाडूला काय शिक्षा द्यावी याची शिफारस करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बीसीसीआयने आपल्याला नियम ३२ अंतर्गत या घटनेच्या चौकशीसाठी नेमले होते. आपण हा अहवाल बीसीसीआयच्या अध्यक्षांना देणार असून ते शिस्तपालन समितीला तो देतील. यानंतर शिस्तपालन समिती या प्रकरणी काय शिक्षा द्यायची किंवा नाही द्यायची हे ठरवणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
हा लेव्हल चारचा गुन्हा असून यात खेळाडू दोषी आढळल्यास बर्याच सामन्यांचा प्रतिबंध त्यावर बसू शकतो किंवा त्याच्यावर कायमची बंदीही घातली जाऊ शकते, असे सांगून मोहम्मद अझरूद्दीन व अजय जडेजा यांच्यावर अशीच कारवाई करण्यात आली आहे, याकडे नानावटींनी लक्ष वेधले.