महाराष्ट्रात २० जुलै रोजी डॉक्टर संपावर जाणार
६ जुलै रोजी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी डोंबिवलीतील शास्त्री महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला केला होता.
शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी डॉक्टरांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोशिएशन यांनी आंदोलन पुकारले आहे. आयएमएने जाहीर केले आहे की, राज्यातील सर्व डोक्टर २० जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात २४ तासांचा संप करणार आहे. या संदर्भात आयएमए ने निवेदन जारी केले आहे.
६ जुलै रोजी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी डोंबिवलीतील शास्त्री महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला केला होता.
आयएमएच्या म्हण्यानुसार, या संपाला ऍलोपथी आयुर्वेद, होमियोपथीचे डॉक्टर तसेच वैद्यकीय संघटना, नर्सिंग संघटना, पेरामेडिकल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य सेवा केशत्राशी संबंधित अनेक संघटनांकडून पाठिंबा मिळाला आहे.
संपदरम्यान सर्व बाह्यरुग्ण आणि उपचार सेवा म्हणजे ओपीडी बंद राहतील. तसेच शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय सेवा थांबवल्या जातील. आपत्कालीन सेवा आणि आयसीयू सेवा सुरु राहतील.
आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णीनी इशारा दिला आहे की, आरोपींवर कठोर कारवाई न केल्यास आयएमए अनिश्चित काळासाठी संप पुकारणार आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये आणि पीडितेला जलद न्याय मिळवा अशी मागणी आयएमए ने केली आहे.
Edited By - Priya Dixit
