1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वेबदुनिया|

आता आडवाणींवर चप्पल

आडवाणी चप्पल भाजप कॉंग्रेस निवडणूक
जॉर्ज बुश, पी.चिदंबरम, नवीन जिंदाल यांच्या यादीत आता भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार लालकृष्ण आडवाणी बसले आहे. मध्यप्रदेशातील कटनी येथे आडवाणी यांच्या प्रचार सभेत भाजप कार्यकर्त्यानेच त्यांच्यावर चप्पल फेकली. चप्पल फेकणारा पावस अग्रवालला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जॉर्ज बुश यांच्या शेवटच्या इराक दौर्‍यादरम्यान टीव्ही पत्रकार मुंतझर अल झैदीने त्यांच्यावर बुट फेकला होता. त्या घटनेची कॉपी दैनिक जागरणचा पत्रकार जरनैलसिंग याने भारतात केली. 1984 मध्ये दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात कॉंग्रेस नेते जगदीश टायटलर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) क्लीन चीट दिल्याप्रकरणी त्याने चिदंबरम यांच्यावर बूट फेकत निषेध नोंदविला. त्यानंतर कॉंग्रेस खासदार नवीन जिंदाल यांच्या सभेत निवृत्त प्राचार्याने बूट फेकून कॉंग्रेसचा धोरणांचा निषेध केला होता.

कटनी येथे गुरुवारी (ता.16) लालकृष्ण आडवाणी यांची प्रचारसभा सुरु असतांना भाजप कार्यकर्त्यानेच त्यांच्यावर चप्पल फेकली. चप्पल फेकणारा पावस अग्रवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.