जितेंद्र झंवर
लोकशाहीत निवडणुकीचे महत्व अनन्यसाधारण आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात निवडणूक म्हणजे एक उत्सवच असतो. लोकसभा निवडणुकीतील 543 मतदार संघात देशातील हजारपेक्षा जास्त लहान, मोठे पक्ष सहभागी होतात. या निवडणुकीत कोण जिंकणार, कोण हरणार? हे ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कृषीमंत्रीपदाचा पदभार सांभाळला. कृषीमंत्रीपदाची त्यांची ही सलग दुसरी टर्म आहे. देशात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ देण्याचे संपुआचे आश्वासन पूर्ण ...
नवी दिल्ली
मायावतींनी या निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहिलं होतं, पण त्यांच्या पक्षाने एवढी वाईट कामगिरी केली की मायावतींनी स्वप्नातही त्याची कल्पना केली नसेल. मायावतींच्या हत्तीने कामगिरी मात्र मुंगीएवढीच केली आहे.
नवी दिल्ली- पंधराव्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉग्रेस आणि यूपीएला बहुमत मिळाल्यानंतर आज कॉग्रेस संसदीय पक्षाचे नेते मनमोहन सिंग आणि यूपीए आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला आहे.
संपुआ संसदीय आघाडीचे नेते मनमोहन सिंह येत्या 22 मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मंगळवारी संपुआ संसदीय समितीने मनमोहन सिंह यांना आपला नेता निश्चित केले. बुधवारी होणार असलेल्या बैठकीत कॅबिनेटमध्ये मंत्र्यांच्या समावेशाबाबत निर्णय घेतला ...
नवी दिल्ली- जनेतेने पुन्हा एकदा कॉग्रेस आघाडीला बहुमत देत सत्ता दिली असून, पक्षाने जनतेला दिलेली सर्व आश्वासनं पाळू आणि जनतेचा विश्वास सार्थ ठरवू असे मत कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत पार तोंडावर पडलेल्या भाजपला आता नेतृत्वाचा प्रश्न भेडसावतो आहे. पंतप्रधानपदाची अडवानींची इच्छा अपूर्ण राहिल्यानंतर आता त्यांना निवृत्तीचे वेध लागले आहेत. त्यामुळे आता पुढील काळात लोकसभेत पक्षाचे नेतृत्व कोण करेल हा नवा ...
नवी दिल्ली
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालाने अनेकांची स्वप्ने चक्काचूर झाली आहेत आणि ही स्वप्ने पाहणार्यांना जमिनीवर आणून ठेवले आहे.
भाजपचे 'पीएम इन वेटिंग' लालकृष्ण अडवानी हे या रांगतले पहिले. अडवानींचे हे स्वप्न आता स्वप्नच ...
नवी दिल्ली
नव्या सरकारमधून विद्यमान रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता असून मुलायमसिंह यांच्या समाजवादी पक्षालाही दूर ठेवण्यात येणार असल्याचे समजते. नव्या मंत्रिमंडळात कॉंग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी केलेल्या पक्षांनाच ...
नवी दिल्ली
तृणमूल कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या युतीने पश्चिम बंगालमध्ये जे वादळ आणले, त्यात डाव्यांचा पार पालापाचोळा करून टाकला. बंगाल व केरळ या दोन्ही बालेकिल्ल्यात डाव्यांना ३४ जागा गमवाव्या लागल्या.
नवी दिल्ली
राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी नव्या सरकार स्थापनेसंदर्भात कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आज त्यांनी माजी सॉलिसिटर जनरल व प्रसिद्ध विधिज्ञ सोली सोराबजी यांच्याशी चर्चा केली. काल त्यांनी माजी सॉलिसिटर जनरल अशोक ...
नवी दिल्ली
लालकृष्ण अडवानी यांनीच लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर रहावे असे आवाहन भारतीय जनशक्तीच्या नेत्या साध्वी उमा भारती यांनी केले आहे. बाकीच्या नेत्यांनी अडवानींची समजूत काढावी अशीही सूचना त्यांनी केली आहे. उमांनी आज अडवानींची भेट घेऊन आपले ...
चेन्नई
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व केंद्रिय गृहमंत्री पी. चिदंबरम लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूत सर्वांत कमी मतांनी जिंकणारे दुसर्या क्रमांकाचे उमेदवार ठरले आहेत.
मुंबई
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे राज्यात सर्वाधिक म्हणजे ३ लाख ३६ हजार ८३१ मतांनी विजयी झाल्या, तर याच पक्षाचे संजय दिना पाटील सर्वांत कमी मतांनी विजयी झाले. विशेष म्हणजे सुप्रियांना पिता शरद पवार ...
मुंबई
शिर्डीतून झालेल्या पराभवाचे खापर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कॉंग्रेसवर फोडले आहे. त्यासाठीच त्यांनी आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली.
मुंबई
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महिलांचे प्रतिनिधित्व घसरले आहे. जेमतेम तीनच महिला ही निवडणूक जिंकू शकल्या. गेल्या निवडणुकीत ही संख्या सहा होती.
नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्यानंतर आता कॉंग्रेसने सरकार बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सत्तारूढ संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या सरकारबाहेरील धर्मनिरपेक्ष पक्षांनाही आपल्यासोबत येण्याचे निमंत्रण दिले आहे.
तमिळनाडूतील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम पराभूत झाल्याचे वृत्त आधी आले होते. मात्र, नंतर ते विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.