1. मराठी बातम्या
  2. निवडणूक
  3. लोकसभा निवडणूक
Written By
Last Updated : मंगळवार, 20 फेब्रुवारी 2024 (13:40 IST)

महायुतीत कोणाला किती जागा?जाणून घ्या

Lok Sabha Elections 2024
सध्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वाटाघाटींना वेग आला असून भाजपच्या वाटेला महायुतीमध्ये अपेक्षेप्रमाणे जास्त जागा आल्या आहेत. शिंदे गट तसेच अजित पवार गट यांना तडजोड करावी लागणार आहे. 
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चेला वेग आला असून.भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर जवळपास ४० जागांवर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे महाविकास आघाडीत. ८ जागांवरुन तिढा कायम आहे. तर महायुतीमधील घटकपक्षांची जागावाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर आली  आहे. राजकीय वर्तुळाला भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात लोकसभेचे जागावाटप काँग्रेस (अजित पवार) यांच्यात लोकसभेचे जागावाटप कसे होणार, याची उत्सुकता लागली  होती. समोर आता लोकसभा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला  महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर आला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, 32-12-4 या सूत्रानुसार महायुतीमध्ये लोकसभेला जागावाटप होण्याची शक्यता आहे. भाजपच्या वाटयाला सर्वाधिक ३२ जागा येण्याची शक्यता आहे .तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला १२ जागा येण्याची शक्यता आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 4 जागां मिळण्याची  शक्यता आहे. लोकसभेला भाजपला अधिक जागा मिळाल्या तरी विधानसभेला शिंदे गट आणि अजित पवार गटाला चांगला वाटा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील नेत्यांमध्ये सध्या महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. पण अंतिम निर्णय हा दिल्लीतून होईल असे सांगण्यात येत आहे. तसेच अमित शाह महत्वाची भूमिका मांडू शकतात. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर शिवसेनेचे एकूण १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. पण सध्याच्या फॉर्म्युलानुसार लोकसभेला शिंदे गटाच्या वाट्याला फक्त १२ जागाच येण्याची शक्यता आहे. 
 
तसेच, जागावाटपाची चर्चा सुरु महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येही आहे. ही चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. ४० जागांवर एकमत झाल्याची माहिती मविआच्या नेत्यांमध्ये आहे. तसेच १८ लोकसभा मतदारसंघांमध्ये समन्वयकांच्या नियुक्त्या उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे की, ठाकरे गट लोकसभेच्या या १८ जागा लढवणार आहे.

Edited By- Dhanashri Naik