गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वेबदुनिया|

यूपीएचा सरकार स्थापनेचा दावा

पंधराव्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉग्रेस आणि यूपीएला बहुमत मिळाल्यानंतर आज कॉग्रेस संसदीय पक्षाचे नेते मनमोहन सिंग आणि यूपीए आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला आहे.

यूपीएच्या पाठीशी 322 खासदारांचे पाठबळ असल्याचे या दाव्यात नमूद करण्यात आले असून, मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी विविध पक्षाच्या पाठिंब्याचे पत्र राष्ट्रपतींना सोपवले आहेत.

अवघ्या दोन तासात आता याचा निर्णय राष्ट्रपती घेणार असून, यूपीएला भक्कम समर्थन असल्याने मनमोहन सरकार स्थापन होणे ही केवळ आता औपचारिकता मानली जात आहे.

राष्ट्रपतींना पत्र सोपवल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्रकारपरिषद घेत सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर आता बसपा आणि सपा या दोनही पक्षांना एकत्र सत्ताधारी पक्षाच्या बाकावर पहायला मिळणार आहे.