मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 25 मे 2009 (19:34 IST)

पवारांनी पदभार स्वीकारला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कृषीमंत्रीपदाचा पदभार सांभाळला. कृषीमंत्रीपदाची त्यांची ही सलग दुसरी टर्म आहे. देशात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ देण्याचे संपुआचे आश्वासन पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीने आपल्या जाहिरन्याम्यात प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 25 किलो तांदूळ आणि गहू तीन रुपये किलोने देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या पुर्ततेला प्राधान्य देणार असल्याचे पवारांनी सांगितले. त्यांनी कृषी भवनात जेष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत देशाच्या कृषी क्षेत्रातील सद्दपरिस्थितीचा आढावा घेतला.