सचिनचा ''आम्ही सातपुते''
|
पण याची कथा 'सत्ते पे सत्ता' शी मिळती जुळती आहे. ती अशी- पूर्णा (सुप्रिया) एक अनाथ मुलगी आहे. तिला अण्णा (अशोक सराफ) आपली मुलगी मानून ते सांभाळतात. अण्णांना स्वतःच्याही सहा मुली असतात. अण्णांची खानावळ आहे. पूर्णा अण्णांच्या किचनचा ताबा घेते. किचनमधील सगळं व्यवस्थापन ती घेते. भाज्यांपासून स्वयंपाकापर्यंत सारं काही ती बघते. सहाजिकच तिच्यामुळे खानावळीचा दर्जाही वाढतो. पूर्णाची अन्नपूर्णा होते.
|
कांद्याचे एकेक दिव्य भाऊ पाहून सटपटलेली पूर्णा अखेर त्यांना शिस्त लावायला पहाते. त्यासाठी कठोर उपाययोजना करते. एकेकाला चांगलेच सरळ करते. संस्कारहीन मुलांवर ती योग्य संस्कार करून त्यांना चांगल्या घरातली मुले अशी ओळख मिळवून देते. संतापी भावांना रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करावे याचे धडेही देते.
पुढे काय होते, योगायोगाने या भावांची भेट पूर्णाच्या सहा बहिणींशी होते. आणि ते सगळे त्यांच्या प्रेमात पडतात. आता काय करायचं? कांद्या एक शक्कल लढवतो आणि त्या सहा बहिणींचे अपहरण करण्याची योजना आखतो. अण्णांना पत्ता न लागू देता तो हा प्लॅन आखतो.
हा प्लॅन काय असतो? कांद्याचे भाऊ पूर्णाच्या बहिणीचे प्रेम मिळविण्यात यशस्वी होतात का? पूर्णा याला संमती देते का? अण्णांना हे मान्य होते का? या सगळ्यांचा शेवट गो़ड होतो का?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'आम्ही सातपुते' बघायला पाहिजे.
