1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात

''कोणालाच बहुमत मिळणार नाही''

तिस-या आघाडीलाच यावेळी बहुमत मिळेल, असा दावा करणारे रिपब्लिकन नेते रामदास आठवले आज नरमले. तीनपैकी कोणत्याच आघाडीला बहूतम मिळण्याची शक्यता नसल्याचा दावा त्यांनी केला. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणूक कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, या स्थितीत आमचे महत्व वाढेल. परंतु, तेव्हा कोणाला मदत करायची, याचा निर्णय निकालानंतरची परिस्थिती पाहून घेण्यात येईल.

प्रत्येक निवडणुकीत जी १०-१२ मते तरंगती असतात, ती यावेळी आघाडीला मिळतील आणि आमच्या जागा निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उमेदवारी देतांना अर्धे उमेदवार हे दलितेतर देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. डॉ. राजेंद्र गवई यांनी आपल्यावर केलेल्या मनमानी कारभाराचे आरोप त्यांनी फेटाळून लावले. त्यांचे माझे काही भांडण नसून ते माझ्या लहान भावासारखे असल्याने चर्चेतून मार्ग काढणार असल्याचे ते म्हणाले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा