विधानसभेवर तिस-यांदा बहुमत मिळविल्‍यानंतर कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडीने सत्ता स्‍थापनेसाठीच्‍या हालचाली जलद केल्‍या असून कॉंग्रेसच्‍या नवनिर्वाचित आमदारांची शनिवारी बैठक आयोजित करण्‍यात आली आहे. या बैठकीत मुख्‍यमंत्री पदासाठीच्‍या उमेदवाराच्‍या नावा ...
नवी दिल्ली महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचे आपण दावेदार नसल्याचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. देशमुखांच्या या माघारीने अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री बनणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
ठाणे- ठाणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघात मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचा अपवाद वगळता शिवसेनेचा भगवा फडकल्याने 'शिवसेनेचे ठाणे' हे ब्रीद पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे डॅशिंग युवानेते जितेंद्र आव्हाड यांनी ...
गुहागर- सेना-भाजप युतीला एक-एक जागा महत्वपूर्ण असतानाच खुर्चीची आस आणि स्वार्थ साधण्याचे परिणाम शिवसेनेसह भाजपला भोगावे लागले. दोघांचे भांडणा अन्‌ तिसर्‍याचा लाभ अशी स्थिती येथे झाली असून रामदास कदम आणि डॉ. विनय नातू यांच्या वादात राष्ट्रवादीच्या ...
कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस वर्चस्वाच्या दूधसाखर प्‌टट्यातील बालेकिल्ल्याला प्रथमच शिवसेना- भाजप युतीने मोठे खिंडार पाडले आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाच्या चार तर शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील चारही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा दारूण पराभव झाला असून कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीण मधून मनसेचे प्रकाश भोईर व रमेश पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. डोंबिवलीचा गड भाजपाने राखला असून भाजपाचे रविंद्र चव्हाण विजयी झाले ...
ठाणे - मुख्यमंत्री ठरवणारा जिल्हा म्हणून गाजावाजा झालेला ठाणे जिल्हयाने कुठल्याही एका पक्षाला वा आघाडीला जनाधार न देता संमिश्र प्रतिसाद दिला आहे.
मुंबई- महाराष्ट्रातील तेराव्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वाचेच लक्ष वेधले होते. मतदारसंघ पुनर्रचना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील तिसरी आघाडी अर्थात रिडालोस, यांच्या अनपेक्षित यशामुळे राज्यातील राजकीय समीकरणे ...
हिंगोली- जिल्ह्यात तीनही विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाने आघाडीत चैतन्य निर्माण झाले आहे. तर युतीच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोलीत आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, कळमनुरी ऍड. राजीव सातव आणि वसमतमध्ये ...
औरंगाबाद - औरगाबाद जिल्ह्यात काँगेसने तीन जागा जिंकून बाजी मारली आहे. सेनेला दोन जागा मिळाल्या आहेत तर दोन जागांवर बंडखोर उमेदवार विजयी झाले आहेत. मनसेने कन्नडची जागा जिंकून खाते उघडले असून राष्ट्रवादी काँग्रेसला पैठणची जागा मिळाली आहे.
मुंबई महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा सत्ता कॉंग्रेस आघाडीकडेच राहिली असली तरी गेल्या वेळचा सत्तेचा तराजू मात्र थोडा हलला आहे. यावेळी प्रथमच भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या असून विरोधीपक्ष नेतेपदही या पक्षाकडेच जाण्याची शक्यता आहे. ...
मुंबई कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी सत्तेत येणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण ही चर्चा सुरू झाली आहे. अर्थातच कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी अर्थातच विद्यमान मुख्यमंत्री अशोक ...
मुंबई शिवसेनेला गेल्या वीस वर्षांत जे अपयश पहावे लागले नाही ते उद्धव ठाकरे यांच्या काळात पहावे लागले आहे. विधानसभेच्या दोन निवडणुका लढवूनही उद्धव पक्षाला सत्तेपर्यंत नेऊ शकले नाही. उलट राज ठाकरे यांच्या मनसेने साडेतीन वर्षांतच विधानसभेत प्रवेश करून ...
मुंबई कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीने राज्यात सलग तिसर्‍यांदा सत्तेचा लगाम आपल्याच हाती राखला असून जवळपास स्पष्ट बहूमतही मिळवले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा कॉंग्रेसच्या खात्यात ८२ तर राष्ट्रवादीकडे ६२ जागा जमा झाल्या होत्या. ...
नागपूर मतमोजणीत सहाव्या फेरीअखेर पिछाडीला असलेले राष्ट्रपतीपुत्र राजेंद्र शेखावत यांनी त्यानंतर मात्र नाट्यमयरित्या पुनरागमन करून कॉंग्रेसचेच बंडखोर उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांना साडेपाच हजार मतांनी पराभूत केले.
''साडेतीन वर्षांत राज्‍यात १३ जागांवर मिळालेले यश निश्चितच आनंददायी असे आहे. मात्र या यशामुळे आता माझ्यावरची जबाबदारीही तेवढी वाढली आहे. याची मला जाणीव आहे. आजवर रस्‍त्‍यावरून मांडलेले मुद्दे आता माझ्या आमदारांकरवी विधानसभेवर मांडले जातील आणि बाकीचं ...
मुंबई महाराष्ट्राच्या बाराव्या विधानसभेत पिता- पुत्राच्या दोन जोड्या पोहोचल्या आहेत. या दोन्ही जोड्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आहेत.

घराणेशाहीला कौल

गुरूवार,ऑक्टोबर 22, 2009
या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना तिकिटे वाटली होती. त्यावरून वादंगही झाला होता. पण आता यातले बव्हंशी उमेदवार विजयी झाल्याने त्यांना जनतेनेही साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. काही जण पराभवाच्याच मार्गावर आहेत. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील पंढरपुरातून पराभूत होणार हे स्पष्ट झाले आहे.
राज्य विधानसभेच्‍या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्‍यास सुरूवात झाली असून दिग्गजांनी अपेक्षित आघाडी घेतली असून राष्‍ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीला निर्विवाद बहुमत मिळणार हे स्‍पष्‍ट झाले आहे.तर उध्‍दव ठाकरे व गोपिनाथ मुंढे यांच्‍या नेतृत्वाला या निवडणुकीतही ...