मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|
Last Modified: नागपूर , गुरूवार, 22 ऑक्टोबर 2009 (18:59 IST)

राष्ट्रपतिपुत्र झाले अखेर आमदार!

मतमोजणीत सहाव्या फेरीअखेर पिछाडीला असलेले राष्ट्रपतीपुत्र राजेंद्र शेखावत यांनी त्यानंतर मात्र नाट्यमयरित्या पुनरागमन करून कॉंग्रेसचेच बंडखोर उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांना साडेपाच हजार मतांनी पराभूत केले.

शेखावत यांनी देशमुखांना ५६१२ मतांनी अस्मान दाखवले. अर्थराज्यमंत्री देशमुख यांचे तिकिट कापून शेखावत यांना उमेदवारी देण्यात आली होती. देशमुखांनी दंड थोपटून अपक्ष अर्ज भरला होता. सहानुभूतीची लाट उत्पन्न होऊन देशमुख विजयापर्यंत पोहोचतील असे चित्र होते. मात्र, अखेरीस शेखावत यांनी त्यांना धोबीपछाड दिलीच.