मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

राष्‍ट्रवादी-कॉंग्रेस 'आघाडी' सत्तेच्‍या दिशेने

युतीला मनसेचा धक्का, मुंबईवर 'राज'

राज्य विधानसभेच्‍या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्‍यास सुरूवात झाली असून दिग्गजांनी अपेक्षित आघाडी घेतली असून राष्‍ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीला निर्विवाद बहुमत मिळणार हे स्‍पष्‍ट झाले आहे.तर उध्‍दव ठाकरे व गोपिनाथ मुंढे यांच्‍या नेतृत्वाला या निवडणुकीतही पुन्‍हा अपयश आल्‍याची चिन्‍हे आहेत. तर राज ठाकरे यांच्‍या महाराष्‍ट्र न‍वनिर्माण सेनेनेही अपे‍क्षेप्रमाणे 14 जागांवर आघाडी घेतली आहे.

शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत बातमी लिहीत असताना कॉंग्रेसने 82 जागांवर आघाडी घेतली असून राष्‍ट्रवादीने 54 जागांवर आघाडी घेतली आहे. तर युतीच्‍या शिवसेना 55 व भाजपने 48 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतर पक्षांनी 29 व तिस-या आघाडीने 10 जागांवर आघाडी घेतली आहे.

मुख्‍यमंत्री अशोक चव्‍हाण (भोकर), उपमुख्‍यमंत्री छगन भूजबळ (येवला), माजी मुख्‍यमंत्री नारायण राणे (कुडाळ), सुशीलकुमार शिंदे यांच्‍या कन्‍या प्रणिती शिंदे (सोलापूर), विलासराव देशमुख यांचे पुत्र लातूरमधून अमित देशमुख, मुक्ताई नगरमधून एकनाथ खडसे, गृहमंत्री जयंत पाटील (इस्‍लामपूर), मधुकर पिचड, मनसेचे नितीन सरदेसाई (माहीम), भाजपच्‍या पंकजा मुंढे हे प्रमुख उमेदवार आघाडीवर आहेत. तर आदेश बांदेकर (माहीम), रावसाहेब शेखावत (अमरावती) हे पिछाडीवर आहे.