शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

पिता-पुत्राची जोडी विधानसभेत

महाराष्ट्राच्या बाराव्या विधानसभेत पिता- पुत्राच्या दोन जोड्या पोहोचल्या आहेत. या दोन्ही जोड्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आहेत.

उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे चिरंजीव पंकज हे अनुक्रमे येवला आणि नांदगाव मतदारसंघातून विधानसभेत जाऊन पोहोचले आहेत. भुजबळांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे माणिकराव शिंदे यांना पन्नास हजार मतांनी पराभूत केले. पंकज यांनी नांदगावमध्ये विद्यमान आमदार शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना बावीस हजार मतांनी हरवले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते व मंत्री गणेश नाईक व त्यांचे पुत्र संदीप हेही विधानसभेत पोहोचले आहेत. गणेश नाईक यांनी बेलापूर येथून बिल्डर सुरेश हावरे यांना तेरा हजार मतांनी पराभूत केले. संदीप नाईक यांनी नवी मुंबईच्याच ऐरोली मतदारसंघातून शिवसेनेच्या विजय चौगुले यांना तेरा हजार मतांनीच पराभूत केले.

श्री. भुजबळ यांचे पुतणे गेल्या निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून तर नाईक यांचे अन्य एक चिरंजीव संदीप नाईक ठाणे मतदारसंघातून खासदार झाले होते.