गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

स्वप्नात आले वानरराज

- गायत्री शर्मा

तुम्हाला हे माहीतच असेल की कुत्र्याला खंडेराव, घुबडाला लक्ष्मी आणि माकडाला हनुमानाचे रूप समजले जाते. पण तुम्ही कधी हे ऐकलंय की मेलेल्या माकडाने कुणाच्या स्वप्नात येऊन सांगितलं की माझ्या दशक्रिया विधीने तुमच्या गावात सुख समृद्धी नांदेल. आणि त्यावर विश्वास ठेवून जर गावक-यांनी त्याचा दशक्रिया विधी केला तर याला तुम्ही काय म्हणालं, श्रद्धा की अंधश्रद्धा?

WD
अशीच एक घटना मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्याच्या 'बरसी' या गावात घडली. या गावात गेल्या वर्षी एका कुत्र्याने माकडाला ठार केले. ग्रामस्थांनी वानर हनुमानाचे रूप म्हणून त्याची अंत्ययात्रा काढली. यात सर्वर गाव सहभागी झालं नंतर माकडाला जमिनीत पुरण्यात आलं.

गावातले नंतर ती घटना विसरलेही मात्र घटनेचया एका वर्षानंतर गावावर एक-एक संकटे येऊ लागली. गावातील पशुधनावर आपत्ती आली तर पाऊसही कमी झाला. त्याच दरम्यान मृत माकड गावचे सरपंच शंकरसिंह सिसोदिया यांच्या स्वप्नात आलं. त्याने सांगितलं की तुम्ही माझा दशक्रिया विधी केला तर तुमच्या गावात समृद्धी नांदेल.

WD
स्वप्नात माकडाने दिलेल्या दृष्टांताने चिंतित झालेले सरपंच शेजारच्या गावात 'नाग देवते'च्या मंदिरात गेले. तिथे एक व्यक्तीच्या अंगात नाग देवता येत असल्याची समजूत आहे. या नागदेवतेने सांगितलं, की माकडाने सांगितल्या प्रमाणे तुम्ही करा.

माकडाला हनुमानाचा अवतार मानणा-या बरसी गावच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून माकडाचा दशक्रिया विधी केला. त्यासाठी प्रत्येक घरातून 5-5 की. ग्रा. धान्य व पैसे गोळा करण्यात आले. त्यासाठी आसपासच्या 15 गावातील लोकांना सामूहिक भोजनाचे निमंत्रणही पाठविले गेले. त्यानंतर हनुमान मंदिरात रात्रभर 'अखंड रामायण' वाचन करण्यात आलं.

WD
एखादा माणूस मेल्यानंतर जशा विधी केल्या जातात त्याच माकडासाठी केल्या गेल्या. सरपंचासह 20-25 पुरुषांनी केशदान केले. उर्वरित विधी उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीवर केल्या गेल्या. या संपूर्ण विधीनंतर दुस-याच दिवशी गावात भरपूर पाऊस झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

या घटनेला तुम्ही काय म्हणालं श्रद्धा की अंधश्रद्धा! पाऊस आला नाही हे माकडाचा कोप असू शकतो का? की माकडाचा धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर पाऊस येणे ही त्याची कृपा? श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा हा खेळ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा...