1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

200 च्या आत कीवी गारद!

तिसर्‍या व अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व निर्माण झाल्याने पाहुण्या न्यूझीलंड संघाची चांगलची दाणादाण उडाली आहे. पाहुण्यांचा अख्खा संघ 193 धावांमध्ये गारद झाला आहे.

पहिल्या दिवशी भारताने चांगली कामगिरी करत न्यूझीलंडच्या अर्ध्या संघाला तंबू दाखवला होता. आज जेसी रायडर व ब्रँडन मॅकुलम यांनी काढलेल्या धावा वगळता इतर एकाही खेळाडूचा निभाव भारतीय गोलंदाजांपुढे लागला नाही.

इशांतने 43 धावा देत चार तर प्रज्ञान ओझाने 57 धावा दे तीन गडी बाद केले. आता भारतीय फलंदाजांकडून आशा आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा