1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. Lucknow Super Giants finally won

LSG vs RCB: लखनौ सुपर जायंट्सने ९ धावांनी विजय मिळवला

cricket
आयपीएल २०२६ चा ५० वा सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. लखनौ सुपर जायंट्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरशी एका चुरशीच्या लढतीत झाला लखनौ सुपर जायंट्सने ९ धावांनी विजय मिळवला.
आयपीएलच्या १९ व्या हंगामातील एक महत्त्वाचा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात खेळला गेला. पावसामुळे सामना प्रत्येकी १९ षटकांचा करण्यात आला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, लखनौ सुपर जायंट्सने १९ षटकांत ३ गडी गमावून २०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने १९ षटकांत २०३ धावा केल्या. डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार, लखनौ संघाने ९ धावांनी सामना जिंकला. लखनौ सुपर जायंट्स अखेर जिंकले
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
पश्चिम बंगालमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसह मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता; अमित शाह उपस्थित राहणार