1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 28 मे 2025 (09:59 IST)

विराट कोहलीने इतिहास रचला, टी20 मध्ये 9 हजार धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज बनला

मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा माजी कर्णधार विराट कोहलीने शानदार कामगिरी करत एक मोठी कामगिरी केली. तो टी-20 मध्ये एकाच संघाकडून खेळताना 9 हजार धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरला. 
या सामन्यात 24 धावा काढताच किंग कोहलीने टी20 मध्ये 9004* धावा केल्या. कोहलीने 2008 मध्ये आरसीबीकडून आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली आणि तेव्हापासून तो त्याच संघाचा भाग आहे. लखनौच्या एकाना स्टेडियममध्ये त्याच्या बॅटने धुमाकूळ घातला आणि तो 9000 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरला. लखनौविरुद्ध त्याने 27 चेंडूत हंगामातील आठवे अर्धशतक झळकावले. तो 30 चेंडूत10चौकारांसह 54 धावा काढल्यानंतर बाद झाला. 
यासह तो आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा फलंदाज बनला. लखनौविरुद्ध अर्धशतक ठोकताच तो या बाबतीत डेव्हिड वॉर्नरच्या पुढे गेला. यापूर्वी कोहली आणि वॉर्नर संयुक्तपणे अव्वल स्थानावर होते. या दोन्ही फलंदाजांच्या नावावर आयपीएलमध्ये 62 अर्धशतके झळकावण्याचा विक्रम होता.
कोहलीच्या नावावर आता 63 अर्धशतके आहेत. रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे, त्याने आयपीएलमध्ये 46अर्धशतके झळकावली आहेत. एका हंगामात सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याच्या बाबतीत कोहलीचा हा तिसरा यशस्वी हंगाम आहे. त्याने 2016 मध्ये 11 आणि 2023 मध्ये आठ अर्धशतके ठोकली.
 
Edited By - Priya Dixit