T20 Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी२० सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध इंग्लंड टी२० मालिकेतील दुसरा सामना अवघ्या काही तासांत सुरू होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी२० मालिका सुरू आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता आणि आता दुसऱ्या सामन्याची पाळी आहे. दोन्ही संघ तयारीच्या अंतिम टप्प्यात आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्याची तयारी करत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड टी२० मालिकेतील दुसरा सामना ४ जुलै रोजी खेळला जाईल. मालिकेतील पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १०:०० वाजता सुरू झाला होता, पण दुसरा सामना लवकर सुरू होईल. मँचेस्टरमधील दुसरा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक अर्धा तास आधी, म्हणजेच संध्याकाळी ६:३० वाजता होईल. जर पूर्ण २०-२० षटके खेळली गेली, तर सामना रात्री ११:३० पर्यंत संपेल.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Maharaja's T20 Trophy 2026: राहुल द्रविडच्या मुलाने वादळी खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला
Edited By- Dhanashri Naik
