नवी जबाबदारी समजताच रडला होता विराट!
कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंग धोनीने दोन वर्षापूर्वी 30 डिसेंबर 2014 रोजी अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा करून क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता.
26 ते 30 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाविरूद्ध मेलबर्नला झालेली तिसरी कसोटी धोनीच्या कारकिर्दमधील शेवटची ठरली होती. धोनीनंतर भारतीय कसोटी संघाचे नेतृत्तव उपकर्धधार असलेल्या विराट कोहलीकडे सोपवण्यात आले होते. मात्र एवढे अचानक घडले की, आपल्यावर नवी जबाबदारी टाकल्याचे कळताच विराटला रडू कोसळले होते.
विराट जानेवारी 2015 मध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या मालिकेत शेवटच्या कसोटीत नेतृत्तव करण्याची संधी मिळाली. चार कसोटी मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये धोनीने नेतृत्तव केले होते.
विराटने एका इंटव्यूहमध्ये खुलासा केला होता की, नव्या जबाबदारीचे वृत्त कानावर पडताच त्याला रडू कोसळले होते. खांद्यावर अचानक पडलेली मोठी जबाबदारी आपल्याकडून पेलवली जाईल की नाही, अशा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला होता. इंटरव्यूहमध्ये विराट म्हणाला होता की धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर माझ्यावर मोठी जबाबदारी आली. खरे सांगायचे तर, संघाचे नेतृत्व करावे लागेल, असा विचारच कधी मनात आला नव्हता.
ऑस्ट्रेलियामध्ये यादरम्यान विराटची गर्लफ्रेंड अनुष्काही होती. विराटने तिला नव्या जबाबदारीविषयी सांगितले. त्यावेळी त्याचे डोळे पाणावले होते. तिलाही आश्र्च्याचा धक्का बसला होता. भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले होते.
