1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

ऐतिहासिक कसोटी आजपासून!

जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताला आजपासून लॉर्ड्सवर सुरू होत असलेल्या ऐतिहासिक 2000व्या कसोटीत इंग्लंडवर वर्चस्व मिळवून विजयासह साम्राज्य कायम राखण्याचे आव्हान असेल. हा सामना अनेक अंगांनी ऐतिहासिक ठरावा. उभय संघांमधील हा शंभरावा सामना तर आहेच शिवाय मास्टर ब्लास्टर सचिनला शतकांचे शतक पूर्ण करण्यासाठी या सामन्यात संधी राहील. याशिवाय एकापाठोपाठ एक विक्रम नोंदविण्यासाठी अनके भारतीय खेळाडू उत्सुक असतील.

99 आंतरराष्ट्रीत शतके ठोकणार्‍या सचिनच्या शंभराव्या शतकासाठी चाहते आसुसले आहेत. तसेच सचिन, लक्ष्मण व द्रविड या त्रिमूर्तींपैकी एकाने जरी लॉर्ड्सवर शतक झळकाविले, तरी तिघांच्या शतकांची बेरीज 100 होणार असल्याने हाही आगळावेगळा विक्रम ठरेल. 1986 मध्ये भारताने लॉर्ड्सवर एकमेव सामना जिंकला होता.

About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा