इंडियन रॉयल्स आणि पाकिस्तान पँथर्स संघ २ ऑगस्ट रोजी आमनेसामने येणार
एशियन लेजेंड्स लीग २०२६ चे सामने सुरू झाले आहे. इंडियन रॉयल्स आणि पाकिस्तान पँथर्स संघ २ ऑगस्ट रोजी आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे माजी खेळाडू दिसणार आहे.
एशियन लेजेंड्स लीग सुरू झाली आहे. यावेळी सहा संघ सहभागी होत आहे. नजीकच्या भविष्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने होणार नसले तरी, या स्पर्धेदरम्यान भारतीय आणि पाकिस्तानी संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील. हा सामना रविवार, २ ऑगस्ट रोजी खेळला जाईल.
या स्पर्धेसाठी शिखर धवन इंडियन रॉयल्सचा कर्णधार आहे, आणि मोहम्मद हाफीज पाकिस्तान पँथर्सचा कर्णधार आहे. शिवाय, दोन्ही संघांमध्ये असे अनेक खेळाडू आहे ज्यांनी यापूर्वी एकमेकांविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे.
इंडियन रॉयल्स आणि पाकिस्तान पँथर्स यांच्यातील सामना २ ऑगस्ट रोजी दुपारी ४:०० वाजता सुरू होईल. हा सामना आफ्रिकन देश झांबियाची राजधानी लुसाका येथे आयोजित केला जाईल. सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार (IST) दुपारी ४:०० वाजता सुरू होईल.
इंडियन रॉयल्स संघ: शिखर धवन (कर्णधार), नमन ओझा (यष्टीरक्षक), अंबाती रायडू, सुरेश रैना, युसूफ पठाण, दिनेश कार्तिक, स्टुअर्ट बिन्नी, शहबाज नदीम, हरभजन सिंग, पवन नेगी, मनप्रीत गोनी, ऋषी धवन, सुदीप त्यागी, फैज फजल, शादाब जकाती, अनुरित सिंग, असद पठाण, सरुल कंवर, ईश्वर पांडे, राघव धवन, सुबोथ भाटी.
पाकिस्तान पँथर्स संघ: शर्जील खान, उमर अकमल, मोहम्मद हाफीज (कर्णधार), शोएब मलिक, कामरान अकमल (यष्टीरक्षक), इम्रान नझीर, सामी अस्लम, अब्दुर रहमान, सोहेल तन्वीर, वहाब रियाझ, सईद अजमल, नावेद-उल-हसन, मोहम्मद इरफान, यासिर अली, रवार, यासिर अली,
Edited By- Dhanashri Naik

