T20 series झिम्बाब्वेने भारताविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघ जाहीर केला
झिम्बाब्वे क्रिकेटने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. काही खेळाडू संघात परतत असताना, यष्टीरक्षक-फलंदाज तफद्झवा त्सिगाने टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.
झिम्बाब्वे २३ जुलैपासून मायदेशात भारताविरुद्ध तीन सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. झिम्बाब्वे क्रिकेटने तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. झिम्बाब्वेने अलीकडेच मायदेशात बांगलादेशविरुद्ध आपली शेवटची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळली असून, संघात तीन बदल करण्यात आले आहे.
झिम्बाब्वेचा भारताविरुद्धचा पहिला टी-२० सामना २३ जुलै रोजी, तर पुढील दोन सामने २५ आणि २६ जुलै रोजी खेळले जातील. हे तिन्ही सामने हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर होणार आहे. झिम्बाब्वेने जाहीर केलेल्या संघात ब्रायन बेनेट, रायन बर्ल आणि वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानी यांचा समावेश आहे. हे तिन्ही खेळाडू अनुभवी मानले जातात.
भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी झिम्बाब्वेचा संघ
सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवंगा, बेन करन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली माधेवेरे, तडवानशे मारुमणी, वेलिंग्टन मसाकाद्झा, ब्लेसिंग मुझारबानी, डिऑन मायर्स, रिचर्ड नगारवा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन शुम्बा, तफाद्झवा त्सिगा.
Edited By- Dhanashri Naik

