Author Dhanashree Naik 85.html

Notifications

national news
धनश्री नाईक
गेल्या दोन वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या धनश्री नाईक सध्या 'वेबदुनिया'च्या मराठी विभागात कनिष्ठ संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांव्यतिरिक्त स्थानिक समस्या आणि घडामोडींना व्यासपीठ मिळवून देण्याकडे धनश्री यांचा कटाक्ष असतो. तळागाळातील बातम्या सोप्या भाषेत मांडणे हे त्यांचे ध्येय आहे.
 
शिवाय, मनोरंजन सृष्टीतील पडद्यामागील गोष्टी आणि पर्यटनातील वैविध्य वाचकांसमोर वस्तुनिष्ठ आणि संतुलित पद्धतीने मांडण्यावर त्यांचा विशेष भर असतो. विषयाचे सखोल विश्लेषण करून पडद्यामागील सत्य समोर आणणारी त्यांची लेखनशैली वाचकांच्या पसंतीस उतरत आहे.

आषाढी एकादशी 2026: उपवासाचे नियम, पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि पारणाची योग्य वेळ

आषाढी एकादशी 2026: उपवासाचे नियम, पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि पारणाची योग्य वेळआषाढी एकादशी २०२६: तिथी आणि शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला 'आषाढी एकादशी' साजरी केली जाते. एकादशी तिथी प्रारंभ: २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ०९:१२ वाजता एकादशी तिथी समाप्ती: २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:३४ वाजता मुख्य उपवासाचा दिवस: २५ जुलै २०२६ (शनिवार) अभिजीत मुहूर्त (पूजेसाठी सर्वोत्तम वेळ): दुपारी १२:१९ ते दुपारी ०१:११ पर्यंत गोधुली मुहूर्त: संध्याकाळी ०७:१७ ते संध्याकाळी ०७:३९ पर्यंत व्रत पारण (उपवास सोडण्याची) वेळ: २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ०६:१३ ते सकाळी ०८:५० या वेळेदरम्यान (टीप: सूर्योदयाच्या तिथीनुसार २५ जुलै रोजी एकादशीचा उपवास धरणे सर्वात फलदायी मानले जाते.)