1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Trains AC coach cabin decorated for honeymoon night after marriage

बापरे! रेल्वेच्या AC कोचमध्येच थाटली 'मधुचंद्राची रात्र'; व्हिडिओ व्हायरल होताच TC थेट निलंबित!

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एसी कोचमधील एक केबिन लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीसाठी सजवलेली दिसत आहे. रेल्वेने कठोर कारवाई करत टीसीला निलंबित केले आहे.
 
ट्रेनच्या फर्स्ट एसी कोचमधील एक केबिन सजवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने कारवाई करत संबंधित टीसीला निलंबित केले आहे. 
रेल्वे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, "६/७/२६ रोजी, ट्रेन क्रमांक ११०२ नंदीग्राम एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने आपला फर्स्ट एसी डबा सजवण्यासाठी ऑनलाइन एका डेकोरेटरला खासगीरित्या नियुक्त केले होते. डेकोरेटरचा डब्यात प्रवेश अनधिकृत होता आणि ही एक गंभीर चूक मानली जात आहे. संबंधित कर्मचाऱ्याला  निलंबित करण्यात आले आहे आणि सविस्तर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे." तपासाच्या निष्कर्षांनुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
रेल्वेने संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले असून ही एक गंभीर सुरक्षा त्रुटी असल्याचे म्हटले आहे. रेल्वे प्रशासनाने सांगितले की, संबंधित कर्मचाऱ्याला निष्काळजीपणाबद्दल तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. सविस्तर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
धनश्री नाईक
गेल्या दोन वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या धनश्री नाईक सध्या 'वेबदुनिया'च्या मराठी विभागात कनिष्ठ संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांव्यतिरिक्त स्थानिक समस्या आणि घडामोडींना व्यासपीठ मिळवून देण्याकडे धनश्री यांचा कटाक्ष असतो. तळागाळातील बातम्या सोप्या भाषेत मांडणे हे.... आणखी वाचा