1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. Team India defeated Zimbabwe by 7 wickets in the first T20

वैभव सूर्यवंशीच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या T20 मध्ये झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला

वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या T20 मध्ये झिम्बाब्वेचा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या T20I मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
 
आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील निराशाजनक पराभवांना मागे टाकत टीम इंडियाने झिम्बाब्वे दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली आहे. भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला आहे. अशा प्रकारे टीम इंडियाने 3 सामन्यांच्या T20I मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 
टीम इंडियाच्या या शानदार विजयात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं मोलाचं योगदान होतं, ज्याने झंझावाती अर्धशतक झळकावून भारतीय संघाच्या विजयाची पायाभरणी तर केलीच, पण टीकाकारांच्या मुसक्या आवळल्या. वैभवने 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत 4 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार ठोकले. या शतकासह वैभवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही नवा इतिहास रचला. तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.
 
हरारे येथे खेळल्या गेलेल्या या पहिल्या T20I सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना यजमान झिम्बाब्वे संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 125 धावा केल्या. 
 
झिम्बाब्वेच्या 125 धावांच्या प्रत्युत्तरात वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी मिळून भारतीय डावाची झंझावाती सुरुवात केली. वैभव सूर्यवंशीने पहिल्याच चेंडूवर गोलंदाजांना लक्ष्य करणे सुरूच ठेवले. वैभवने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक पूर्ण करण्याचा मोठा पराक्रम केला.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस विठ्ठलाच्या भक्तीत लीन झाले