Injured Collingwood will return back | जखमी कॉलिंगवुड मायदेशी परतणार
विश्वकरंडकाच्या तोंडावर इंग्लंडचा संघ दुखपतीने ग्रस्त असून त्यांचे प्रमुख सहा खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. अष्टपैलू पॉल कॉलिंगवुडलाही पाठीचे दुखने उमळले असून त्यास ऑस्ट्रेलिया दौरा सोडून मायदेशी परतावे लागणार आहे.
टिम ब्रेसनन, ग्रॅमी स्वान, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस ट्रेमलेट आणि अजमल शहजाद या जखमी खेळाडूंमध्ये आता कॉलिंगवुडचाही समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या सहाव्या सामन्यादरम्यान कॉलिंगवुड जखमी झाला होता. या सामन्यात इंग्लंडला पराभव पत्करावा लागला होता.
कॉलिंगवुड पाठीच्या दुखण्यामुळे ऑस्ट्रेलिया दौर्यातील उर्वरित सामने खेळणार नसून मायदेशी परतणार असल्याची पृष्टी इंग्लंड संघव्यवस्थापणाने केली आहे.