जो जिंकेल तो फायनलमध्ये!
आयपीएलने आता शेवटच्या सत्रात प्रवेश केला असून, पहिल्या प्ले-ऑफ लढतीमध्ये साखळी फेरीतील सर्वाधिक यशस्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे आव्हान चेन्नई सुपर किंग्जसमोर असणार आहे. ख्रिस गेलच्या बळावर बाद फेरीत प्रवेश करणार्या बंगळूरला त्याचा आधार असून, सुपर किंग्जसमोर गेलचे वादळ रोखण्याचे आव्हान असणार आहे.
साखळी फेरीतील शेवटच्या लढतीत बंगळूरने चेन्नईवर सोपा विजय साजरा करून यंदा गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले. चांगल्या रनरेटमुळे चेन्नईचा संघ दुसर्या स्थानावर राहिला. मात्र, धोनी बिग्रेडच्या मर्यादा या लढतीत समोर आल्या. दक्षिणेतील हे दोन्ही संघ आज तटस्थ ठिकाणी अर्थात वानखेडे स्टेडियमवर भिडणार आहेत. त्यामुळे घरच्या मैदानाचा फायदा दोघांनाही मिळणार नाही. साखळी फेरीत चेन्नई आणि बंगळूर यांनी एकमेकांविरुद्ध 1-1 लढती जिंकल्या आहेत.
गेल, डिविलियर्स आणि विराट कोहली हे बंगळूरचे तीन फलंदाज चेन्नईसाठी डोकेदुखी ठरू शकतात. चेन्नईच्या इतर फलंदाजांना या महत्त्वाच्या लढतीत कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करावी लागेल. रैना, हस्सी, ब्रदीनाथ यांनी तुकड्यात चांगली कामगिरी केली आहे.