तर भारताला ''पॅकअप'' करावा लागेल!
ND |
आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने अखेरच्या षटकात नेहराच्या हाती चेंडू देऊन आपला पराभव स्वीकारला. कर्णधार धोनीला नेतृत्वाचा ठसा उमटविण्यात साफ अपयश आले आहे. आफ्रिकेविरुद्ध महत्वाच्या लढतीत अश्विनला संघात घ्यायला हवे होते पण या सार्या चर्चा थंड झाल्या असून आता बाद फेरीचे दरवाजे बंद करण्यासाठी अन्य संघांनी नवीन योजन आखली आहे.
आफ्रिका आयर्लंडचा परभाव करून दोन गुणांची कमाई करणार ह निश्चित आहे. बांगलादेश आणि द. आफ्रिका यांच्यात साखळीतील अखेरची लढत होईल. त्या लढतीत बांगलादेश आफ्रिकेला पराभूत करून बाद फेरीतील आपली जागा पक्की करणार. आफ्रिका व बांगलादेश यांचे 8-8 असे समान गुर होतील पण नेट रनरेटच्या आधारे आफ्रिका वरचढ ठरेल. इंग्लंड, वेस्टइंडिज यांच्यातील सामना एकतर्फी होऊन इंग्लंडचा विजय झाला तर टीम इंडियाचे स्थान निश्चित धोक्यात येईल. सद्या टीम इंडियाने आघाडीचे स्थान पटकविले असले तरीसुद्धा शेवटच्या लढतीत विंडिजविरूद्ध पराभव झाला तर त्याला आपले पॅकअप करावे लागेल.
