1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

धोनी -गंभीर आमने-सामने

कोची टस्कर्सविरुद्ध पराभव पत्करावा लागलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा सामना आज गतविजेत्या चेन्नई सुपर किग्जशी होणार आहे. सलग तीन विजय साकारल्यानंतर कोलकाता संघाला गुरुवारी झालेल्या सामन्यात कोचीकडून १७ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. कोलकाता संघाचे आता केवळ ४ साखळी सामने शिल्लक आहेत. त्यामुळे या सामन्यात कोणतीही चूक करून कोलकाताचा संघ अंतिम चार जणांमधील स्थान धोक्यात आणू इच्छित नाही. त्याचप्रमाणे हा सामना ईडन्स गार्डनवर होत असल्याने घरच्या मैदानावर चेन्नईला हरवण्यासही कोलकात्याचा संघ उत्सुक असेल.

About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा