1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

पाक संघाची निवड लांबणीवर!

राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांमध्ये एकमत न झाल्याने झिम्बाब्वे दौर्‍यासाठी पाक संघाची निवड लांबणीवर पडली आहे. काही नवीन खेळाडूंना संधी देतानाच युनूस खान, उमर गुल आणि तौफीक उमर यांच्यासारख्या सीनिअर खेळाडूंच्या सहभागाबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. पण कोणाला घ्यावे यावर एकमत होऊ शकले नाही.

झिम्बाब्वे दौर्‍यात पाक एक कसोटी, तीन वन-डे आणि टी-20 लढत खेळणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात यूएइमध्ये लंकेविरुद्ध मालिका खेळेल. आगामी महत्त्वाचे दौरे लक्षात घेऊन संघाती निवड काळजीपूर्वक केली जाणार असल्याचे निवड समितीचे अध्यक्ष मोहसीन खान यांनी सांगितले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा