भारत-इंग्लंड मॅच टाय!
ND
टीम इंडियाने वर्ल्डकपमधील सलग दुसर्या सामन्यात त्रिशतक ठोकून इंग्लंडपुढे विजयासाठी 339 धावांचे भरभक्कम आव्हान ठेवले होते. त्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंड संघानेही 338 धावा केल्या.
इंग्लंडतर्फे स्ट्रॉस व केव्हिन पीटरस न यांनी 68 धावांची सलामी दिली. मुनाफने पीटरसनला बाद करून इंग्लंडला पहिला धक्का दिला. तर नंतर थोड्यात वेळात चावलाने ट्रॉटला पायचित केले. त्यांनतर स्ट्रॉसने इयान बेलसमवेत 170 धावांची भागीदारी करीत संघाची धावसंख्या 281वर पोहोचवली. मात्र, यानंतर झहीरने दोन, तर हरभजन, मुनाफ व चावला यांनीही प्रत्येकी एक विकेट घेत चुरस निर्माण केली.
शेवटच्या दोन षटकांत स्वान व शहजाद यांनी तडाखेबंद फलंदाजी करीत संघाचा पराभव टाळला. शेवटी इंग्लंडला 5 चेंडूत 11 धावा हव्या असताना शहजादने मुनाफला षटकार मारला. शेवटच्या चेंडूवर इंग्लंडला दोन धावा हव्या होत्या. मात्र, शहजादला एकच धाव घेता आल्यामुळे हा सामना टाय झाला.
