1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

भारताचा ऐतिहासिक विजय.....

स्वप्न साकारले, भारताने जग जिंकले!

भारताची ऐतिहासिक विजय
ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि आता श्रीलंकाला पराभूत करत भारताने तब्बल २८ वर्षानंतर विश्वकरंडकावर आपले नाव कोरले आणि आपणच क्रिकेटमधील जगज्जेता असल्याचे सिद्ध करून दाखविले. गेल्या दोन दशकांपासून विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न बाळगणाऱया आणि घरच्याच मैदानावर विश्वकरंडक उंचावण्याची संधी मिळालेल्या सचिन तेंडुलकरसह कोट्यवधी क्रिकेटप्रेमींची आनंद या विजयामुळे द्विगुणित झाला आहे.

श्रीलंकेच्या २७५ धावांचा डोंगर भारताने लिलया पेलला. गौतम गंभीरने केलेल्या ९७ धावा आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नाबाद ९१ धावा या भारताच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.

क्रिकेटच्या पंढरीत, लॉर्ड्सवर १९८३ मध्ये घडवलेला इतिहास आज पुन्हा भारतीय क्रिकेटच्या पंढरीत घडला ... मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर गेली २८ वर्ष जपलेले स्वप्न पुन्हा एकदा साकारले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा