1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

यजमानपद काढले तरी पाक मालामाल!

यजमानपद काढले तरी पाक मालामाल
दोन वर्षांपूर्वी श्रीलंकन क्रिकेटपटूंवर लाहोरमध्ये हल्ला झाल्यानंतर पाककडून वर्ल्डकपचे यजमानपद काढून घेण्यात आले होते व तेथे होणार्‍या 14 लढती भारत, श्रीलंका व बांगलादेशला वाटून देण्यात आल्या होत्या. विश्वकरंडक सामने रद्द झाले तरी पाकला नुकसानभरपाई म्हणून प्रत्येक लढतीसाठी 4 लाख लॉडर पाकला यजमान फिस मिळणार आहे.

यजमानांनी केलेल्या करारानुसार पाकला ही रक्कम मिळणार आहे. ही रक्कम पाच लाख डॉलरपर्यंत जाऊ शकते, असे पाक क्रिकेट मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा