1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

सेहवागचे शतक हुकले!

न्यूझीलंडने केलेल्या 350 धावांचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली असून, विरेंद्र सेहवागचे शतक मात्र हुकल्याने भारतीय चाहते निराश झाले आहेत.

गौतम गंभीर व सेहवागने शानदार खेळ करत पहिल्याच दिवशी दीड शतक पूर्ण केल्याने आता पाहुण्‍या संघावरील दबाव वाढला आहे.

दुसर्‍या दिवशी हरभजन सिंग व जहीर खान यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्याने कीवी संघ केवळ 350 धावांपर्यंत मजल मारू शकला.
यानंतर भारताची फलंदाजी सुरु झाल्यावर विरु व गौतम गंभीर यांनी दणकेबाज खेळ करत भारताची धावसंख्या दीडशतकी केली.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा