1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. नोकरीच्या संधी
Written By वेबदुनिया|

एसटी महामंडळात 628 जागा

महाराष्ट्र एसटी महामंडळ
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात परिव्यय लेखांकन अधिकारी (1 जागा), कनिष्ठ प्रक्रिया योजना अधिकारी (1 जागा), उपयंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक (5 जागा), आगार व्यवस्थापक (यांत्रिकी)/ सहायक यंत्र अभियंता (32 जागा), सहायक/विभागीय भांडार अधिकारी (9 जागा), विभागीय अभियंता (9 जागा), विभागीय वाहतूक अधिकारी/आगार व्यवस्थापक -वरिष्ठ (1 जागा), आगार व्यवस्थापक-वाहतूक/विभागीय वाहतूक अधीक्षक (20 जागा), सहायक/विभागीय लेखा अधिकारी (11 जागा), विभागीय सांख्यिकी (9 जागा), सुरक्षा व दक्षता अधिकारी (8 जागा), सहायक/विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी (2 जागा), कामगार अधिकारी (12 जागा), सहायक कार्यशाळा अधीक्षक-कनिष्ठ (60 जागा), वरिष्ठ कार्यदेशक-कनिष्ठ (42 जागा), कनिष्ठ कार्यदेशक-कनिष्ठ (16 जागा), प्रभारक-कनिष्ठ (44 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (9 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत (7 जागा), सहायक वाहतूक अधीक्षक (49 जागा), वाहतूक निरीक्षक-कनिष्ठ (122 जागा), लेखाकार-कनिष्ठ (105 जागा), भांडार पर्यवेक्षक-कनिष्ठ (21 जागा), भांडारपाल-कनिष्ठ (20 जागा), सुरक्षा निरीक्षक (4 जागा), सहायक सुरक्षा निरीक्षक (7 जागा), आग रक्षक (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज 19 सप्टेंबर 2009 पर्यंत पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळच्या मुंबई आवृत्तीत प्रसिद्ध झाली आहे.

(महान्यूज)