शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 1 मार्च 2016 (13:27 IST)

संधी रोजगाराची खात्री नोकरीची

उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची माहिती देणार्‍या नोकरी शोधामध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी!
 
वसई उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात पोलीस पाटील पदाची भरती
पालघर जिल्ह्यातील वसई उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात ‘पोलीस पाटील’ पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज http://formonline.net/vasaipp या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
 
बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या ७७ जागा
बँक ऑफ इंडियाच्या मुंबई मुख्यालयात चार्टर्ड अकाऊंटंट (२० जागा), रिस्क ॲनेलिस्ट (४ जागा), लॉ ऑफिसर (५ जागा), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (४२ जागा), टेक्निकल ऑफिसर (प्रिपायसेस) (२ जागा), टेक्निकल ऑफिसर (ॲप्रेसल) (४ जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.bankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
भारतीय आयुर्विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदाच्या दोन जागा
भारतीय आयुर्विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी (२ जागा) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.licindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीमध्ये दोन जागा
सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटी, रायगड-अलिबागमार्फत वैद्यकीय अधिकारी (१ जागा), जिल्हा पी.पी.एम.समन्वयक (१ जागा) या पदांसाठी शैक्षणिक अर्हता पात्र उमेदवारांनी दि. ४ मार्च २०१६ रोजी सकाळी ११.०० वाजता मूळ कागदपत्रांसह थेट मुलाखतीस जिल्हा प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय आवार, अलिबाग येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी दै.सकाळचा दि. २४ फेब्रुवारी २०१६ रोजीचा अंक पहावा.
 
ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर. ज.जी. समूह रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक (अधिव्याख्याता) पदाच्या जागा
विभागीय निवड मंडळामार्फत ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत नागरी स्वास्थ्य केंद्र, वांदे (पूर्व), मुंबई येथे साहाय्यक प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, बालरोगचिकित्साशास्त्र, बधिरीकरणशास्त्र आणि सर. ज.जी. समूह रुग्णालय, मुंबई येथे साहाय्यक प्राध्यापक बधिरीकरणशास्त्र या पदाकरिता विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०१६ आहे. अधिक माहितीसाठी दै.लोकसत्ताचा दि. २४ फेब्रुवारी २०१६ रोजीचा अंक पहावा.
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा (गट-अ) या पदाची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा (गट-अ) या पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती https://mahampsc.mahaonline.gov.in तसेच www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहयोगी प्राध्यापक, शालाक्य तंत्र महाराष्ट्र आयुर्वेदीक सेवा गट-अ या पदाची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहयोगी प्राध्यापक, शालाक्यतंत्र महाराष्ट्र आयुर्वेदीक सेवा गट-अ या पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती https://mahampsc.mahaonline.gov.in तसेच www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, वैद्यकीय शिक्षण व व औषधी द्रव्ये विभाग (गट-ब) च्या अपंगासाठी पाच जागा 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, वैद्यकीय शिक्षण व व औषधी द्रव्ये विभाग (गट-ब) पदाच्या अपंगाच्या पाच जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती https://mahampsc.mahaonline.gov.in तसेच www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
 
संरक्षण मंत्रालयात फायरमेन आणि ट्रेड्समेन मॅट पदाच्या ३८ जागा
संरक्षण मंत्रालयात फायरमेन (६ जागा), ट्रेड्समेन मॅट (३२ जागा) भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २८ दिवस आहे. अधिक माहिती http://indianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
 
नगरविकास विभागात विविध पदाच्या ६ जागा
नगरविकास विभागाअंतर्गत स्टेट मिशन मॅनेजमेंट युनिट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पुरस्कृत अमृत मिशनसाठी अर्बन प्लॅनर स्पेशालिस्ट (१ जागा), म्युनिसिपल फायनान्स स्पेशालिस्ट (१ जागा), अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर स्पेशालिस्ट (१ जागा), कॅपेसिटी बिल्डिंग स्पेशालिस्ट (१ जागा), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम मॉनिटरींग ॲण्ड इव्हॅल्युअेशन स्पेशालिस्ट (१ जागा), प्रोक्युरमेंट स्पेशालिस्ट (१ जागा) या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ८ मार्च २०१६ आहे. अधिक माहितीसाठी दै.लोकसत्ताचा दिनांक २३ फेब्रुवारी २०१६ रोजीचा अंक पहावा. 
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 7 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ (1 जागा), सहयोगी प्राध्यापक-शालाक्यतंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ (1 जागा), औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, गट-ब (5 जागा) या पदांच्या सरळसेवा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 8 मार्च, 2016 आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in व http://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत विविध पदांच्या जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत असिस्टंट सेक्शन ऑफिसर (सेंट्रल सेक्रेटरीअेट सर्विस), असिस्टंट (सेंट्रल व्हिजीलंस कमिशन), असिस्टंट (इंटेलिजन्स ब्युरो), असिस्टंट (मिनीस्ट्री ऑफ रेल्वे), असिस्टंट (मिनीस्ट्री ऑफ एक्स्टरनल अफेअर्स), असिस्टंट (अेएफएचक्यु), असिस्टंट (अदर मिनीस्ट्रीज/ डिपार्टमेंट्स/ऑर्गनायझेशन), असिस्टंट (अदर मिनीस्ट्रीज/डिपार्टमेंट्स/ऑर्गनायझेशन), इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (सीबीडीटी), इन्स्पेक्टर (सेंट्रल एक्साईज)(सीबीईसी), इन्स्पेक्टर (प्रेव्हेन्टीव्ह ऑफिसर) (सीबीईसी), इन्स्पेक्टर (एक्झामिनर), (सीबीईसी), असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर (डायक्टरेट ऑफ एन्फोर्समेंट डिपार्टमेंट ऑफ रिव्हेन्यू), सब इन्स्पेक्टर (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन), इन्स्पेक्टर (डिपार्टमेंट पोस्ट), डिव्हीजनल अकाऊन्टंट (ऑफिसेस अन्डर सीअेजी), स्टेटीस्टीकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-२ (एम/ओ स्टेटीस्टीकल अँड प्रोग्राम इम्प्लीमेंटेशन, इन्स्पेक्टर (सेंट्रल ब्युरो ऑफ नॅर्कोटीक्स), सब इन्स्पेक्टर (नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (एनआयए), असिस्टंट ऑडिट ऑफिसर (इंडियन ऑडिट अँड अकाऊंट डिपार्टमेंट, सीएजी), ऑडिटर (ऑफिसेस अन्डर सी अँड अेजी), ऑडिटर (ऑफिसेस अन्डर सीजीडीए), ऑडिटर (ऑफिसेस अन्डर सीजीडीए अँड अदर्स), अकाऊंटंट/ज्युनिअर अकाऊंटंट (ऑफिसेस अन्डर सीजीए ॲण्ड अदर), सिनीअर सेक्रेटरीएट असिस्टंट (सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसेस/मिनीस्ट्रीज सीएससीएस), टॅक्स असिस्टंट (सीबीडीटी), टॅक्स असिस्टंट (सीबीईसी), कम्प्लायर (रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया), सब इन्स्पेक्टर (सेंट्रल ब्युरो ऑफ नॅर्कोटीक्स) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
जलसंपदा विभागाअंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची मेगा भरती (१२५६ पदे)
जलसंपदा विभागाअंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या एकूण १२५६ पदांच्या भरतीकरीता कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) राज्यस्तरीय सरळसेवा निवड समिती, नागपूर यांच्या मार्फत राज्यात सर्वत्र सरळसेवा परीक्षा २०१६ घेण्यात येणार आहे. या पदांमध्ये जलसंपदा विभागाची 1144 तर जलसंधारण विभागाची 122 पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दि. 8 मार्च 2016 असा आहे. अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज http://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
 
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये तंत्रज्ञ-3 पदाच्या 947 जागा
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कपनीच्या विविध औष्णिक विद्युत केंद्रातील तंत्रज्ञ-3 पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 9 मार्च 2016 आहे. अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्ज www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या १७० जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागात ज्युनिअर सायंटिफिक ऑफिसर (ईलेक्ट्रॉनिक) (२ जागा), ज्युनिअर सायंटिफिक ऑफिसर (मेकॅनिकल) (२ जागा), असिस्टंट डायरेक्टर (१ जागा), असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-२ (मॅकेनिकल) (६ जागा), असिस्टंट प्रोफेसर (बॉटनी) (१६ जागा), असिस्टंट प्रोफेसर (केमिस्ट्री) (२० जागा), असिस्टंट प्रोफेसर (कॉमर्स) (३ जागा), असिस्टंट प्रोफेसर (इकोनॉमिक्स), (२० जागा), असिस्टंट प्रोफेसर (इंग्लिश) (२९ जागा), असिस्टंट प्रोफेसर (फ्रेंच) (७ जागा), असिस्टंट प्रोफेसर (हिंदी) (५ जागा), असिस्टंट प्रोफेसर (हिस्ट्री) (८ जागा), असिस्टंट प्रोफेसर (होम सायन्स) (३ जागा), असिस्टंट प्रोफेसर (लॉजिक/फिलॉसॉफी) (१ जागा), असिस्टंट प्रोफेसर (मल्याळम) (१ जागा), असिस्टंट प्रोफेसर (मॅथेमेटिक्स) (१५ जागा), असिस्टंट प्रोफेसर (फिजिक्स) (१७ जागा), असिस्टंट प्रोफेसर (पॉलिटीक्स) (२ जागा), असिस्टंट प्रोफेसर (तमिळ) (४ जागा), असिस्टंट प्रोफेसर (टुरिझम) (१ जागा), असिस्टंट प्रोफेसर (झुलॉजी) (७ जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ३ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
ठाणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागात कंत्राटी पदांच्या 32 जागा
ठाणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाकडील महिला व बालकल्याण योजनेंतर्गत कंत्राटी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रकल्प अधिकारी (01), माहिती/मूल्यांकन संनियंत्रण व्यवस्थापक (01), सहायक प्रकल्प अधिकारी (10), समूह संघटक (10) आणि डाटा एण्ट्री ऑपरेटर (10) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 20 फेब्रुवारी 2016 असून याबाबतची जाहिरात 11 फेब्रुवारीच्या लोकमतच्या मुंबई आवृत्तीत प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी www.thanecity.gov.in यावर संपर्क साधावा. 
 
केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल (तांत्रिक/ट्रेड्समेन) ची भरती (१९० जागा)
दक्षिण विभाग, केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्यातर्फे सीटी (तांत्रिक व ट्रेडसमन) पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये सीटी/ड्रायव्हर (पुरुष) (३८ जागा), सीटी/फिटर (पुरुष) (१३ जागा), सीटी/बगलर (पुरुष) (३३ जागा), सीटी/टेलर (पुरुष) (४ जागा), सीटी/कॉबलर (पुरुष) (४ जागा), सीटी/कार्पोंटर (पुरुष) (१ जागा), सीटी/गार्डनर (पुरुष) (१ जागा), सीटी/पेण्टर (पुरुष) (१ जागा), सीटी/पाईप बॅण्ड (पुरुष) (२ जागा), सीटी/कुक (पुरुष) (३९ जागा), सीटी/वॉटर कॅरियर (पुरुष) (२२ जागा), सीटी/सफाई कर्मचारी (पुरुष) (१५ जागा), सीटी/बार्बर (पुरुष) (४ जागा), सीटी/वॉशरमन (पुरुष) (३ जागा), सीटी/बगलर (महिला) (१ जागा), सीटी/टेलर (महिला) (१ जागा), सीटी/कुक (महिला) (१ जागा), सीटी/वॉटर कॅरियर (महिला) (१ जागा), सीटी/सफाई कर्मचारी (महिला) (३ जागा), सीटी/हेयर ड्रेसर (महिला) (१ जागा), सीटी/वॉशर वुमन (महिला) (२ जागा) अशी एकूण १९० पदे आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १० मार्च २०१६ आहे. ऑनलाईन अर्ज आणि अधिक माहिती दिनांक 6 फेब्रुवारी 2016 चा लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत पहावा. तसेच विस्तृत माहिती    www.crpfindia.com  व www.crpf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
 
महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन २०१५-१६
महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन २०१५-१६ अंतर्गत राज्यात सर्वत्र पोलीस शिपाई पदाची भरती सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ४ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती http://mahapolice.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
 
आरपीएफ/आरपीएसएफमध्ये महिला हवालदार पदांच्या २०३० जागा
भारतीय रेल्वेमध्ये आरपीएफ/आरपीएसएफमध्ये हवालदारांच्या २०३० पदांच्या भरतीकरीता पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.scr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
 
सीआरपीएफमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) पदाच्या २२९ जागा
भारत सरकारच्या गृह विभागाअंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलामधील (सीआरपीएफ) साहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो)च्या पदाकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज दि. १ फेब्रुवारी ते १ मार्च, २०१६ या कालावधीत www.crpfindia.com या संकेतस्थळावर भरता येतील. तसेच अधिक माहिती www.crpf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
 
कोकण रेल्वेमध्ये वैद्यकीय अधिकारी पदाची भरती
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. (केआरसीएल) मध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज 
करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०१६ आहे. अधिक माहिती www.konkanrailway.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.