1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
  4. आर्मी स्टाइल जॅकेट

Army Style Jacket in Marathi, Shahrukh in Marathi, Army Caps | आर्मी स्टाइल जॅकेट

सध्या जॅकेटमध्ये सगळ्यात जास्त बोलबाला आहे, आर्मी स्टाइल स्वेटर्स आणि जॅकेटस्चा. 'जब तक है जान'मधील शाहरुख खानच्या आर्मी लुकमध्ये तरुणाई आणि मार्केट भलतेच प्रभावित झालेले आहेत. त्यामुळे आर्मी लुकच्या जॅकेट्‍स, टोप्यांनी बाजारात धुमाकू घातला आहे. या आर्मी जॅकेटवर कार्टून्स, इंग्लंड, अमेरिका तसंच ऑस्ट्रेलिया अशा देशांच्या झेंड्यांचे फोटो दिसत आहेत. काही जॅकेटस्वर तर या झेंड्यांच्या फोटोचं मस्तपैकी कोलाजही केलेलं दिसून येते.

आर्मी ड्रेसवरून प्रेरणा घेऊन केलेले हिरवे कोट्स आणि यूएस आर्मी सारखे करड्या आणि हिरव्या रंगाचं मिक्सींग असलेले कोट्स फुल्ल फॉर्मात आहेत. आर्मी प्रिंट असलेली ही जॅकेट्‍स पूर्ण बाह्या आणि स्लिव्हलेस अशा दोन्ही प्रकारांमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही रंगाच्या कपड्यांवर शोभून दिसणार्‍या आणि काहीसा गंभीर तरीही कूल लूक मिळवून देणार्‍या या जॅकेट्सला मागणी आहे. शिवाय मागे जोडलेल्या टोपी अथवा हूडमुळे ती अधिक ट्रेंडी वाटतात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा