1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
  4. चित्रपट परीक्षण : लय भारी

चित्रपट परीक्षण : लय भारी

मराठीला तमिळ तडका..

लय भारी प्रदर्शित झाला आहे. आई आणि मुलाच्या नातेसंबंधावर आधारित असा लय भारी हा चित्रपट आहे. गावात दबदबा आणि पत असूनही केवळ निपुत्रिक असल्यामुळे या जोडप्याला देवळातील पूजेच्या मानापासून वंचित केले जाते. पतीचा देवापेक्षा डॉक्टरवर जास्त विश्वास असतो. मात्र, आपल्या पतीच्या नकळत पंढरपूरच्या वारीला जाऊन पत्नीने विठोबाला घातलेल्या साकडय़ामुळे या जोडप्याला पुत्रप्राप्ती होते. हा मुलगा नंतर मोठा होतो. परदेशातून शिकून पुन्हा मायदेशी परततो.


गावात परतल्यावर आपले काका आणि चुलत भाऊ यांच्याकडून गावकर्‍यांचा छळ होत असल्याचे त्याला कळते. त्यांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्या जात असल्याचे त्याच्या समोर येते. या शेतकर्‍यांना हक्काची जमीन आणि घर मिळावं म्हणून त्या मुलाची आणि त्याच्या वडिलांची धडपड चालू असते. आपल्या मार्गात हे दोघेही अडथळा असल्याचे जाणून या दोघांचा जीव काका आणि चुलत भाऊ घेतात. नंतर होते ती आपल्या लय भारी स्टाईलमध्ये माउलीची एन्ट्री. पुढे जाऊन माउली गावकर्‍यांची कशी मदत करतो. या दरम्यान, त्याची प्रेमकहाणी आणि विठोबा-रखुमाईवरचे प्रेम चित्रीत करण्यात आले आहे. मराठी चित्रपटाला बॉलिवूड आणि तमिळ चित्रपटाचा तडका दिल्यावर काय होते याचे उदाहरण म्हणजे लय भारी. सुरुवातीला आपण 90 च्या दशकातला एखादा बॉलिवूड चित्रपट बघत आहोत असे वाटते. त्यामुळे कुठे तरी पुढे काय घडणार याची चाहूल आपल्याला आधीच लागते. पण, सुरुवातीच्या 10 मिनिटांनंतरच माउली माउली गाणं येतं आणि आपल्याला संपूर्ण भान हरपायला लावतं.