''सॉरी भाई'' रूचणार नाही
|
'सॉरी भाई' हा चित्रपट थोडा जास्तच बोल्ड आहे. आपल्या भावाच्या होणा-या पत्नीशी अर्थात वहिनाशीस अफेअर करण्याची ही थीम परंपरावादी प्रेक्षकांना नक्कीच रूचणार नाही एवढेच काय तर आधुनीक विचाराच्या लोकांनाही रूचणार नाही.
|
|
आलिया जवळीक वाढवते तेव्हा सिद्धार्थही तिच्या प्रेमात पडतो. सिद्धार्थची आईला याबाबत संशय येतो. आणि हे सर्वांना कळते तेव्हा माथुर कुटूंबात वादळ येते. चित्रपट रोमांस आणि कॉमेडीने भरपूर आहे. चित्रपटात असे अनेक क्षण आहेत ज्यावेळी पोटधरून हसू येते आणि काहीवेळा डोळ्यातून पाणीही येते.
चित्रपटाची थीम रोचक आहे पण, चित्रपट रोचक वाटत नाही. शरमन जोशीचा अभिनय उत्तम आहे. चित्रांगदा सिंह ही नैसर्गिक अभिनेत्री आहे. आणि शबाना सारख्या सक्षम अभिनेत्रीसमोर तिने आपली वेगळी छाप सोडली आहे. शबाना आजमी यांनी नेहमीसारखाच ताकदीचा अभिनय केला आहे. बोमन यांनी त्यांना चांगली साथ दिली आहे. पण, संजय सूरी यांना जादा संधी मिळालेली नाही. काळ बदलला आहे, पण नातेसबंधांवर चर्चा होते तेव्हा प्रेक्षक परंपरावादी बनतात. 'सॉरी भाई' ची थीम भारतीय प्रेक्षकांना सहजासहजी पचणारी नाही.
